संस्था

Friday, August 21, 2015

संस्था ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाबत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षण संस्था ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी  आवाहन करण्यात येते की,
शिक्षण संस्थांनी  education.maharashtra.gov.in या वेब पोर्टल मध्ये संस्था रजिस्ट्रेशन या टॅबचा वापर करून संस्था ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
रजिस्ट्रेशन करताना आपली संस्था ज्या जिल्ह्यातून  पी.टी.आर. (PTR) उतारा घेत असेल तो नोंदणी जिल्हा निवडावा.
संस्था ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळालेल्या युजर आय डी आणि पासवर्ड यांचा वापर करून संस्थेची माहिती भरावी आणि संस्था फायनलाईज कराव्या.
संस्थेची मान्यतापत्रे,अनुसूची १(संस्थेची सध्याची कार्यकारीणी मा.धर्मादाय कार्यालयातून प्राप्त,अनुसूची ३ (संस्थेची सध्याची कार्यकारीणी मा.धर्मादाय कार्यालयात प्रलंबित) ऑनलाईन अपलोड करून संबंधित सत्यप्रती मा.शिक्षणाधिकारी-माध्यमिक (संस्था कार्यालय ज्या जिल्ह्यात असेल तो जिल्हा) यांच्याकडे सादर करून संस्था ऑनलाईन फायनलाईज करून घ्याव्या.

अधिक माहितीसाठी ९४२११४९५०७/९५२१४४२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.