संस्था

Thursday, November 12, 2015

पायाभूत चाचणी गुण नोंद

पायाभूत चाचणी गुणनोंद केल्यानंतर MIS या पर्यायाचा वापर करून गुण नोंद पडताळणी करता येईल.
Student Portal वर Baseline चे Marks भरण्यासाठी सध्या तात्पुरती स्थगिती................. . Student Portal वर नवीन विद्यार्थ्याची entry करण्याबाबत यथावकाश सूचना/वेळापत्रक देण्यात येईल.

Saturday, November 7, 2015

संस्था रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम दिनांक २५/११/२०१५

Friday, November 6, 2015

INSPIRE AWARDS

इन्स्पायर अ‍ॅवॉर्डसाठी नोंदविलेल्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तरी शाळांनी Login करून खात्री करावी.

राष्ट्रीय/राज्य शिक्षक पुरस्कार




राष्ट्रीय/राज्य शिक्षक पुरस्कार व थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सन २०१५-१६ साठी विहित नमुन्यात दि.२०/११/२०१५ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यामिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे आवाहन..

Friday, August 21, 2015

संस्था ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाबत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षण संस्था ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी  आवाहन करण्यात येते की,
शिक्षण संस्थांनी  education.maharashtra.gov.in या वेब पोर्टल मध्ये संस्था रजिस्ट्रेशन या टॅबचा वापर करून संस्था ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे.
रजिस्ट्रेशन करताना आपली संस्था ज्या जिल्ह्यातून  पी.टी.आर. (PTR) उतारा घेत असेल तो नोंदणी जिल्हा निवडावा.
संस्था ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून मिळालेल्या युजर आय डी आणि पासवर्ड यांचा वापर करून संस्थेची माहिती भरावी आणि संस्था फायनलाईज कराव्या.
संस्थेची मान्यतापत्रे,अनुसूची १(संस्थेची सध्याची कार्यकारीणी मा.धर्मादाय कार्यालयातून प्राप्त,अनुसूची ३ (संस्थेची सध्याची कार्यकारीणी मा.धर्मादाय कार्यालयात प्रलंबित) ऑनलाईन अपलोड करून संबंधित सत्यप्रती मा.शिक्षणाधिकारी-माध्यमिक (संस्था कार्यालय ज्या जिल्ह्यात असेल तो जिल्हा) यांच्याकडे सादर करून संस्था ऑनलाईन फायनलाईज करून घ्याव्या.

अधिक माहितीसाठी ९४२११४९५०७/९५२१४४२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.